सहकार्याची सुरूवात! भारत-चीन सीमारेषेवरून सैन्य मागे घेण्यास सुरूवात

    28-Oct-2024
Total Views |

india china (1)
 
 
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील झालेल्या करार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. ४ वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात असलेल्या सीमवादाला आता अखेर पूर्णविराम मिळणार आहे. पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवरील लष्करी संरचना हटवण्याबाबत दोन्ही बाजूंच्या सैन्याने परस्पर पडताळणी केल्यानंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली जाईल.

पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर असताना, भारत आणि चीन यांच्या मध्ये समन्वय साधणारा करार झाला. त्यानंतर लगेचच दोन्ही देशातील लष्करांनी आपआपल्या फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतला. गलवान खोऱ्यात २०२० साली झालेल्या चकमकीनंतर अवघ्या ४ वर्षांनी सकल भागात शांतता प्रसथापित होण्याची चिन्हं आहेत. नियंत्रण रेषेलगतच्या भागात दोन्ही बाजूच्या सैन्याकडून नियमीत गस्त घालण्याची प्रक्रिया सुरू होईल हा अंदाज वर्तवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियातील ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पूर्व लडाखमधील एलएसीवरील नियंत्रण रेषेवरील गस्त आणि सैन्य मागे घेण्याची प्रक्रियेवरील  करारावर शिक्कामोर्तब केले.

 एस. जयशंकर यांची प्रतिक्रीया
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रविवारी परिषदेत म्हणाले की "लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक येथील सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध पूर्वपदावर येतील अशी आशा मी व्यक्त करतो. परंतु ही केवळ पहिली पायरी आहे. जोवर समोरच्यांकडून ही प्रति क्रीया केली जात नाही, तोवर ही प्रक्रीया पूर्ण होणार नाही."