काँग्रेसला धक्का! दिग्गज नेत्याने भाजपमध्ये केला पक्षप्रवेश

    28-Oct-2024
Total Views |
 
Manas Sinha
 
रांची : झाऱखंड येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मानस सिन्हा (Manas Sinha) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी पत्र लिहून काँग्रेसप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले प्रेरणास्थान मानले असल्याचे त्यांनी संबोधन केले आहे. या कार्यक्रमाला हिमंत बिस्वा सरमाही उपस्थित होते.
 
२७ वर्षानंतर काँग्रेस पक्षासोबत राहून त्यांनी पक्षासाठी आपले रक्त सांडले असल्याचे ते म्हणाले. तसेच पक्षात कार्यकर्त्यांचा आदर नाही याची आता खात्री पटली आहे. त्यांचा संयम संपला म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने भाजपमध्ये प्रवेश केला.
 
दरम्यान, त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, माझ्या सहनशीलतेची मर्यागा आता ओलांडली आहे. आतापर्यंत मी काँग्रेसचा विचार करायचो पण आता मी स्वत:चा विचार केला आहे.