जम्मू-काश्मीर येथे मजुरावर गोळीबार

    24-Oct-2024
Total Views |

Jammu and Kashmir
 
जम्मू-काश्मीर : काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथे कामावर येणाऱ्या मजुरांवर दहशतवादी हल्ले करत आहेत. गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी दक्षिण काश्मीर येथे त्राल जिल्ह्यात एका स्थलांतरित मजुराला दहशतवाद्यांना गोळ्या घालून जखमी केले. दहशतवादी हल्ल्यात मजूर जखमी झाला असल्याची माहिती आहे. उमर अब्दुल्ला यांचे सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीर येथे मोठ्या प्रामाणात दहशतवाद निर्माण होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
प्रीतम सिंह असे जखमी झालेल्या मजुराचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या गंभीर जखमी असलेला मजुरावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला झालेल्या परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम राबविण्यात येत आहे.
 
यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी दहशतवाद्यांनी गांदरबल येथे बोगद्यासाठी काम करणाऱ्या ७ मजुरांची हत्या केली होती. हे मजूर काश्मीरचे स्थानिक रहिवासी नसल्याची माहिती आहे. दरम्यान एका काश्मीरी डॉक्टरचीही हत्या करण्यात आली होती. त्याचे एक फुटेजही समोर आले आहे.