बिहारच्या कटिहार-पूर्णिया रेल्वे मार्गावर लोखंडी वस्तू ठेवून घातपात करण्याचा प्रयत्न

    23-Oct-2024
Total Views | 42

Rail Jihad
पाटणा : बिहारच्या कटिहार-पूर्णिया रेल्वे मार्गावर लोखंडी वस्तू ठेवून रेल्वेचा घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. संबंधित लोखंडी वस्तू ही रेल्वेच्या चाकात अडकली होती. यावेळी लोको पायलेटला लोखंडी वस्तू दिसताच त्याने रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठी दुर्घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
प्रासरमाध्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी ट्रॅकवर दोन १० मिमी लोखंडी बार ठेवण्यात आले होते. कटिहारहून जोगबनीकडे जाणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये हे बार अडकल्याची माहिती आहे. त्यानंतर आता लोको पायलटने रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रेल्वे थांबली. याबाबतची माहिती लोकोपायलटने बाकीच्या कर्मचाऱ्यांना कळवली. यानंतर रेल्वेच्या चाकांमधून बार काढण्यात आल्याची माहिती आहे.
 
याप्रकरणाबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करून दोषींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत. याप्रकरणात कट्टरपंथींचा समावेश असल्याची माहिती आहे.
 
अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. काही दिवसांआधी काही अल्पवयीन युवकांनी वंदेभारत या रेल्वेवरही दगडफेक केल्याची घटना घडली होती. अशा घटना, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात येथे घडलेल्या आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121