राज्यातील संपुर्ण बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार? चर्चांना उधाण

    01-Oct-2024
Total Views | 171
 
Sharad Pawar & KCR
 
मुंबई : राज्यातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा अख्खाच्या अख्खा पक्ष शरद पवार गटात विलीन होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर शरद पवार बीआरएसचे अध्यक्ष केसीआर यांना धक्का देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
लवकरच विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा होईल. अशातच अनेक पक्षांमध्ये नेत्यांची ये-जा सुरु आहे. दरम्यान, आता राज्यातील बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. बीआरएस पक्षातील नेते पक्षाला रामराम ठोकत लवकरच शरद पवारांचे बोट धरणार आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
 
हे वाचलंत का? -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनेते गोविंदा यांची विचारपूस!
 
लोकसभा निवडणूकीपूर्वी बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. त्यावेळी नागपूरमध्ये पक्षाचे कार्यालयही उघडण्यात आले होते. परंतू, आता विधानसभेच्या तोंडावर पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण पक्ष आता शरद पवार गटात दाखल होणार आहे.  
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121