दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले गुंतवणूकदारांचे आभार

    18-Jan-2024
Total Views | 81

Shinde Davos


मुंबई :
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून गुरुवारी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. एकुण ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
 
याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
 
"हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत. उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवले," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
"दावोस परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १६ तारखेला ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीला ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. त्यानंतर आता गुरुवारी ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील," असेही मुख्यमंत्री म्हणाले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121