"आदित्य ठाकरे तुमच्या बुद्धीचे आज धिंदवडे निघालेत!"
भाजपचा युवराजांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
30-Sep-2023
Total Views | 99
मुंबई : ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात आला आहे. मात्र, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी याबद्दल प्रश्न उपस्थित करत राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. "ही वाखनखे परतावा आहेत का?", असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागितले होते. आता @AUThackeray छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागत आहेत.
शिवरायांच्या पराक्रमावर शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आज तुमच्या बुद्धीचे (?) धिंडवडे निघाले. pic.twitter.com/VJqsoH8SNl
आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर अकाऊंटवरुन निशाणा साधला आहे. 'उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागितले होते. आता आदित्य ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागत आहेत. शिवरायांच्या पराक्रमावर शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आज तुमच्या बुद्धीचे (?) धिंडवडे निघाले.' अशी टीका करण्यात आली आहे.