नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना , ठाकरे गट , Shiv Sena, Thackeray Groupच्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही दि. १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात दि. १८ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आजपासून नियमित सुनावणी होणार आहे.
आज कोर्टात होणारी दुसरी सुनावणीही तितकीच महत्त्वाची आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई या दोन्ही सुनावणी वेळी उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे दिलं होतं. त्यांना या प्रकरणावर निर्णय देण्यास सांगितलं होतं. मात्र, तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी या प्रकरणावर निर्णय दिला गेला नाही. आता कुठे या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी सुरू केली आहे.
दरम्यान, आजच्या सुनावणीवर प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे; १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही आजच सुनावणी होणार आहे.