1984 च्या शीख दंगलीवेळी 'मोहब्बत की दुकान' कुठे होती - सरमांचा राहुल गांधींना थेट सवाल

    18-Sep-2023
Total Views |

Himanta Biswa Sarma


भोपाळ :
मध्य प्रदेश राज्यात प्रचारादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "राहुल यांच्या पक्षाला सनातनला संपवायचे आहे." काँग्रेस विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. याच आघाडीतील द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला नष्ट करण्याची धमकी दिली होती.
 
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे काँग्रेसच्या काही नेत्यांनी समर्थन केले होते. त्यामुळे हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना म्हटले की, "सनातनला कोणीही नष्ट करू शकत नाही. मी राहुल गांधींना स्पष्ट सांगतो की सनातन होते, सनातन आहे आणि सनातनच राहतील. सनातनचा जगभर प्रसार करायचा आहे, हे आता आपण सर्व हिंदूंनी ठरवायचे आहे."
 
हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानवर देखील टीका केली. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "राहुल नेहमी प्रेमाच्या दुकानाबद्दल बोलतात, पण १९८४ शीख दंगलीच्या वेळी त्यांचे दुकान कुठे होते ते त्यांनी सांगावे."

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.