मुंबई: मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या दिनानिमित्त संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पूर्ण मंत्रीमंडळ उपस्थित होतं. संधी मिळाली तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू. असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषद सुरु असतानाच राऊत आले नाहीत का? असा सवाल केला. त्यानंतर थोडावेळ थांबून मी एका माध्यम प्रतिनीधी राऊत यांच्याबद्दल विचारत असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. राऊतांनी या पत्रकार परिषदेचा पास ही घेतल्याच्या चर्चा होत्या.
नेमकं काय म्हणाले होते राऊत?
मंत्रीमंडळ बैठकीसाठी आम्ही संभाजीनगरमध्ये थांबलो आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर आम्हीही संवाद साधू. तुम्ही किती खोटं बोलता हे ऐकायचं आहे. आम्हाला संधी मिळाली तर पत्रकार परिषदेला हजर राहू. आम्ही सगळे पत्रकार आहोत. पोलिसांनी अडवलं नाही, तर पत्रकार परिषदेला नक्की जाऊ. असं राऊत म्हणाले होते.