मुंबई: माझ्यावर पाळत ठेवली जातेय, असा दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. राऊत मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे म्हणाले होते. मात्र, ते गेले नाही. यावरुन मुख्यमंत्र्यांनी टीका केली. शिंदेंच्या या टीकेवर राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
मला येण्यासाठी पासची गरज नाही. मी खासदार आहे. मी संभाजीनगरला येतो म्हणुन त्यांनी बंधनं टाकली. मी सामना कार्यालयात होतो, तेव्हा माझ्यावर पाळत ठेवली. मी पत्रकार परिषदेला येईन याची मुख्यमंत्र्यांना धाकधुक होती. सरकारने माझ्यावर पाळत ठेवली. मुख्यमंत्र्यांनी १ रुपया सुद्धा मराठवाड्याला दिला नसल्याचा आरोप राऊतांनी केला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.