महापारेषणच्या अद्ययावत संकेतस्थळाचे डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते उदघाटन!

महापारेषणमध्ये राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात साजरा

    16-Sep-2023
Total Views |
Mahapareshan news

मुंबई
: भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून महापारेषणच्या ईआरपी-आयटी विभागाने संचलन व सुव्यवस्था विभागाकरिता तयार केलेल्या एसओआर (शेड्युल ऑफ रेट), महापारेषणचे अद्ययावत संकेतस्थळ तसेच अधिकारी वर्गाकरिता ड्रोन वापराबाबत डॅशबोर्डचे अनावरण महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले.
 
महाराष्ट्रवासियांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे. महाराष्ट्राला सुरळीत व अखंडित वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी महापारेषणच्या विविध प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून ती प्रगतिपथावर आहेत. महाराष्ट्रवासियांचे जीवन सुसह्य करण्यात महापारेषणच्या अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दात महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी अभियंत्यांचा गौरव केला. तसेच भविष्यातही अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चांगली व सातत्यपूर्ण कामगिरी करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी अभियंत्यांना दिला.
 
सुरूवातीला भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून डॉ. संजीव कुमार यांनी सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापारेषणचे संचालक (संचलन) संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक (वित्त) अशोक फळणीकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, कार्यकारी संचालक (संचलन) रोहिदास मस्के, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) संतोष आंबेरकर, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) कैलास कणसे, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) सुधीर वानखेडे, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) नागसेन वानखेडे, मुख्य अभियंता पीयूष शर्मा, भूषण बल्लाळ यांचेसह विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.