१७ व्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; म्हणाले,'आपल्या दोघांना मिळून मराठ्यांना आरक्षण द्यायचे’

    14-Sep-2023
Total Views |
Manoj Jarange Patil strike update

मुंबई
: गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. मात्र काही दिवसांपुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनवंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाटील म्हणाले की, शेवटी मुख्यमंत्री शिंदेना उपोषण स्थळी मी आणूनच दाखवलं. मुळात कुणाच्या सांगण्यावरून मी आंदोलन करत नाही. मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता फक्त शिंदेंमध्येच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यापेक्षा १० दिवस वेळ वाढवून घ्यावा. पण मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.

याआधी उपोषण मागे घेण्यासाठी पाटील यांनी काही अटी सरकारसमोर ठेवल्या होत्या. यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ आणि दोन्ही राजे उपोषण सोडवण्यासाठी यावे अशी अट त्यांनी घातली होती. मात्र दोन्ही राजे उपोषण स्थळी आले नसले तरी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेला. त्यामुळेच पाटील म्हणाले की, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात. तोपर्यतच आम्हाला आरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.

या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री दानवे, गिरीश महाजन इत्यादी नेते आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे चंद्रकात पाटील आणि तीन सरकारी अधिकारी ही उपस्थित होते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.