रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री कराण्याचा उद्धव ठाकरेंकडून प्रस्ताव?
- आ. नितेश राणेंनी केला खुलासा
13-Sep-2023
Total Views | 208
मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. मुख्य म्हणजे या बैठकीस अनेक विरोधी पक्षातील नेते हे गैरहजर राहणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मात्र यावेळी उपस्थित असतील. दरम्यान राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आल्यास रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यावं, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी मांडला असल्याचं आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, " विरोधी पक्षाच्या आघाडीची एक बैठक होते आहे. ही बैठक नेमकं कशाला होते? या बैठकीतून काय निघणार आहे का? हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. या बैठकीला JDUचे जाणार होते ते जात नाहीयेत. CPM पक्षातून कोणी जाताना दिसत नाही आहे. अभिषेक बॅनर्जी अगर जाऊ शकले नसते तर दुसरा प्रतिनिधी जाऊ शकला असता. तेही गेलेले नाहीयेत. म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी जे सांगितलं होतं हे सगळं खर आहे. जे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष नेत्यांची जी काही बैठका असतात. ते खाण्यापिण्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि याच्यातून उदाहरण आजची ही बैठक आहे."
"जी हयातला बैठक झालेली अशी त्याच्या अगोदर बैठक झालेली त्या बैठकीतून नेमकं काय निघालं? साधं लोगो तरी फाइनल केलं होतं का? नाही. मला काही हयातच्या लोकांनी केला. आणि ज्यांनी यजमानपद तिथल्या कार्यक्रमाचं भूषवलं. मला त्या संजय राजाराम राऊत आणि उद्धवजी ठाकरेंना विचारायचं आहे की,आजतागायत त्या हयातला जो काय तुम्ही कार्यक्रम घेतला, बैठक घेतली. त्या सगळ्याचं बिल आजपर्यंत दिलं आहे का? त्या हयात हॉटेलच्या लोकांना दमदाटी देणं काम सुरू आहे. या बैठका नेमक्या कशाला घेतल्या जातायेत आणि त्या निमित्तानी जे करोडो पैशाची उधळपट्टी होते जे खाणंपिणं होतं आहे त्याच्यात साधं बिल पण देण्याचं काम हे लोक करत नाहीत आणि बोलत आहेत की देश चालवणार आहेत." अशी टीका राणेंनी यावेळी केली.