मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन उदय सामंत जालन्याकडे रवाना!

    12-Sep-2023
Total Views | 56
 
Uday Samant
 
 
मुंबई: मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा १५ दिवस असून अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे जरांगे यांच्या भेटीसाठी दुसऱ्यांदा आले आहेत. सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाची प्रत जरांगे यांना देण्यात आली. आपण एकत्र आल्यामुळे सरकार आपल्यासमोर झुकले. प्रथमच सर्व पक्षांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणसंदर्भात ठराव करण्यात आला. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या प्रश्नावर प्रथमच सर्व पक्ष एकत्र आले, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
 
तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन उदय सामंत जालन्याकडे रवाना झाले आहेत. विशेष विमानाने उदय सामंत रवाना झाले आहेत. हा संदेश काय आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. आम्ही आरक्षण देतो, एक महिना द्या, असे सरकारने म्हटले आहे. एक महिन्याचा वेळ दिला तर जबाबदारी सरकारची असणार आहे. सरकारला महिन्याभराचा वेळा द्यायचा की एक दिवसाचा जीआर घ्यावा. सरकारला वेळ दिला तरी माझे आंदोलन थांबणार नाही. मी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला. आतपर्यंत आपण ४० वर्ष दिली आता एक महिना देऊ या. यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
 
मराठा समाजाची सर्वात मोठी सभा 12 ऑक्टोंबरला घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे. जात बदनाम होऊ नये, म्हणून दोन पावले मागे हटत आहे. मी आमरण उपोषण सोडण्यास तयार आहे. पण जागा सोडणार नाही. महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121