शिवरायांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारू: शरद सोनवणे

    12-Sep-2023
Total Views |

Shivaray 
 
 
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नर येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली. चाळकवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोनवणे यांनी सांगितले कि कांस्य धातुमध्ये असणारा हा पुतळा स्वखर्चात एका वर्षाच्या आत उभा करून त्याचे लोकार्पण करणार आहे. तसेच पुतळ्याची उंची,शिल्पकार व जागा निश्चित केलेली असुन त्याबद्दलची सविस्तर माहिती येत्या २९ सप्टेंबर रोजी देण्यात येणार असुन पुढील तीन महत्वपुर्ण घोषणा देखील त्यावेळी करणार आहे.
 
"याबद्दलची माहिती भीमाशंकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली आहे. त्यांनी त्याबद्दल सकारात्मक भूमिका दाखविली असुन येत्या चार दिवसात भेटण्याची वेळ दिली असून त्याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत देखील यावर चर्चा केलेली आहे.तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे." असं शरद सोनवणे म्हणाले.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.