सावंतवाडीत पहिलं थिम पार्क सुरू!

    11-Sep-2023
Total Views | 236
 
Fish Theme Park
 
 
मुंबई: आपल्याला निसर्गाद्वारे लाभलेली देणगी म्हणजे कोकण आणि समुद्र! इतकी भव्य समुद्री संपदा आणि जैवविविधता लाभलेली असताना देश विदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी सिंधुदुर्गात पाहायला मिळणार आहेत. कारण या जिल्ह्यात आता भारतातील पहिलं फिश थीम पार्क उभारण्यात येत आहे. याबद्द्ल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली.
 
 
 
या KSR ग्लोबल अ‍ॅक्वेरियमचे उद्घाटन रविंद्र चव्हाण यांची आई शुभांगिनी चव्हाण आणि बाबा दत्तात्रय चव्हाण यांच्या शुभहस्ते आज (११ सप्टें) करण्यात आलं. याआधीच या जिल्ह्याची महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उपक्रम राबवले जातात. यात आता फिश थीम पार्कची भर पडणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली असून छोटेखानी तळे निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार असून गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पहावयास मिळणार आहेत. असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121