न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश
राज्यपालांकडून उपाध्याय यांना शपथ
29-Jul-2023
Total Views | 133
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी उपाध्याय यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. दि. २९ जुलै रोजी राजभवनात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे ३० मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार यांची उच्च न्यायालयाचे प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. दरम्यान ६ जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायवृंदाने न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.