केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर पोहोचले पद्मश्री पद्मजा फेणाणींच्या भेटीला!

    01-Jun-2023
Total Views | 52

padmaja fenani 
 
मुंबई : सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भेट घेतली. मुंबईत पद्मजा यांच्या राहत्या घरी झालेल्या भेटीत त्यांनी राजकारणापासून संगीत क्षेत्राबाबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान पद्मजा फेणाणी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. देशाला मोदींनी केवढ्या ऊंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि जगभरात आज आपल्या देशाची कशी दखल घेतली जात आहे याबद्दल सांगत पद्मजा फेणाणी यांनी पंतप्रधानांच्या कार्याची प्रशंसा केली.
 
पद्मजा यांनी अनुराग यांना आपल्या सुरेल आवाजातील गीत गाऊन दाखवले. देशाचे साह्याने पंतप्रधान आणि जागतिक पातळीवर होतं असलेला विकास यासंदर्भातही मनमोकळ्या चर्चा यावेळी झाल्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121