राधिका देशपांडेने घेतली भिडे गुरुजींची भेट! म्हणाली, "'छडी लागे छम छम'च्या…"

    31-May-2023
Total Views |

radhika deshpande 
 
मुंबई : अभिनेत्री राधिका देशपांडे हिने काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे यांच्या सोबत सांगली येथे जाऊन संभाजी भिडे म्हणजेच भिडे गुरुजी यांची भेट घेतली. आता या भेटीचे फोटो राधिकाने शेयर केले आहेत. सोबतच एक पोस्ट देखील तिने लिहिली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत राधिका अरुंधतीच्या खास मैत्रीणीची म्हणजे 'देविका'ची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे.
 
तिने संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर एक पोस्ट लिहिली आहे. सोबतच भेटीचे फोटो शेअर करत ती म्हणते, "छडी लागे छम छम"च्या काळातली माणसं "वयम् मोठम् खोटम्" वाटायला लावणारी आहेत. इंदिरा आजी १०३ तर भिडे गुरुजी ९० सांगली मिरजकडे राहणारी ही पिकलेल्या आंब्या सारखी गोड आणि चिरोट्यांच्या पापुद्र्यांसारखी त्यांची कांती, साजूक तुपाचे पावित्र्य आणि वागण्या बोलण्यातला ओलावा?.. तेवत असलेल्या समयीच्या वातीतला. वटवृक्षाच्या झाडासारखी मातीत घप्प मुळांचे गोफ गुंफित तटस्थ उभी. त्यांना पारंब्या तरी किती! त्यांच्या सावलीत काही क्षण वेचता आले, पारंब्यांवर झुलता आले."
 
पुढे राधिका म्हणाली, ''आजी होती मऊ मऊ. तर गुरुजींच्या नजरेतून एकही गोष्ट सुटली नाही. विलक्षण! मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते. करं जोडोनी मागते मी तुजला.. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.