अदा शर्माचा संताप; लवकरच पुरावे देणार!

    26-May-2023
Total Views |

ada sharma 
 
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या सत्यतेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर अभिनेत्री अदा शर्माने एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे. अदा शर्मा म्हणाली, “निर्मात्यांकडे असलेले तथ्यात्मक पुरावे लवकरच समोर येणार आहेत. पुरावे त्यांना आधी दाखवायचे नव्हाते. कारण आधी पुरावे दाखवले असते, तर सर्वकाही फक्त प्रमोशनसाठी सुरु आहे. असा तुम्ही विचार केला असता..’ चित्रपटाच्या प्रमोशनपूर्वी पुरावे उघड करायचे नाहीत असे ठरले होते असे अदाच्या वक्तव्यावरून समजते.
 
अदा पुढे म्हणाली, "सिनेमाला झालेल्या विरोधाचा आणि रंगलेल्या वादाचा कोणताही परिणाम ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झाला नाही आणि सिनेमाने सर्व अडचणींवर मात केली आहे. ‘निवडणुकीचा हा परिणाम आहे. असं देखील अनेक जण म्हणाले. पण तिसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाचं उत्तम कलेक्शन होत आहे. अशात सिनेमा प्रोपगंडा असल्याचं अनेक जण म्हणाले. शिवाय कमाईच्या आकड्यांना देखील फेक सांगितलं.’
 
३२००० आकड्याच्या मुद्द्यावरूनही अदा चांगलीच संतापली. म्हणाली, "ज्या मुलींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे, सुरुवातीला मला खूप तणाव वाटत होता. मी रागवायचे. माणसाचं आयुष्य इकतं स्वस्त आहे का? ज्याला आपण फक्त आकड्यांमध्ये मोजतो. ती व्यक्ती आपली नसल्यामुळे तिला आपण आकड्यांमध्ये मोजतो. त्या आकड्यांमध्ये तुमची आई, बहीण, प्रेमिका, मैत्री असती तर मला नाही वाटत तेव्हा लोक आकड्यांबद्दल बोलले असते. मग ते ३ असो किंवा ३२ हजार’"
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.