मुंबई : अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला गुन्हेगारी थरारपट 'रेड २' बॉक्स ऑफिसवर चांगलीच गती पकडून आहे. प्रदर्शनाच्या ११व्या दिवशी या चित्रपटाने कमाईत उंच झेप घेतली. 'सॅकनिल्क' च्या अहवालानुसार, दुसऱ्या रविवारी 'रेड २' ने ११.७५ कोटी रुपयांची कमाई केली, जी शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या कमाईपेक्षा जास्त आहे.
चित्रपटाच्या ११ दिवसांत भारतातील एकूण नेट कमाई १२०.७५ कोटी रुपये इतकी झाली आहे. भारतात एकूण ग्रॉस कमाई १२९.७ कोटी इतकी असून जगभरातील एकूण कमाई १४८.२ कोटी रुपये झाली आहे. परदेशात या चित्रपटाने १८.५ कोटी रुपये कमावले आहेत. निर्मात्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकड्यांनुसार, रेड २ ची भारत NBOC (नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन) ११२.४२ कोटी रुपये इतकी आहे.
हा चित्रपट अजय देवगणच्या कारकिर्दीतील आठवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे, तर रितेश देशमुखसाठी हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. ‘जात’ आणि ‘केसरी २’ या अलीकडच्या प्रदर्शित चित्रपटांशी तुलना करता, ‘रेड २’ ने त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मात्र अजूनही या चित्रपटाला ‘शैतान’ या सिनेमाची कमाई पार करता आलेली नाही.
रविवारी ‘रेड २’ ची देशभरातील एकूण थिएटर ऑक्युपन्सी ३०.१६ टक्के इतकी होती. दुपारी आणि संध्याकाळी प्रेक्षकांची विशेष गर्दी दिसून आली. भारतभरात एकूण ४२९९ शो चालू होते. त्यात चेन्नईमध्ये सर्वाधिक ६३.७५% ऑक्युपन्सी होती (२८ शो), तर बेंगळुरूमध्ये ३९.२५% (२११ शो), पुण्यात ३७.२५% (३०३ शो), मुंबईत २९.५०% (७३३ शो), आणि दिल्ली-एनसीआरमध्ये २८.२५% (११९१ शो) ऑक्युपन्सी नोंदवली गेली.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.