'केरला स्टोरी'मुळे उघड झाला लव्ह जिहादचा कट! कडीकुलूप बंद पीडितेची सुटका!

सिगारेटचे चटके, व्रण, ड्रग्जच्या विळख्यात ढकलून देहविक्रीसाठी प्रवृत्त करण्याचाही प्रयत्न!

    26-May-2023
Total Views |
 
Gopichand Padalkar
 
 
मुंबई : मंचर येथील हिंदू धनगर समाजाची मुलगी, जिला चार वर्षापूर्वी एका मुस्लिम युवकाने फूस लावून पळवून नेले होते. तशा पद्धतीची तक्रार तिच्या वडिलांनी मंचर पोलिस स्टेशनला दिली होती. आई वडिलांना त्या मुलाच्या विषयी शंका होती. त्याचं नावं ही पोलिसांना सांगितलं होतं. परंतु पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. वारंवार तिथं हेलपाटे घालून देखील त्यांना मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही. मात्र, केरला स्टोरी पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना कल्पना आली. ही सर्व माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत दिली.
 
याविषयी सविस्तर सांगताना पडळकर म्हणाले, "केरला स्टोरी पाहिल्यानंतर काही समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत या कुटुंबियातल्या लोकांनी संपर्क साधला. त्यांनी या मुलीविषयी त्या मुलाविषयीची माहिती दिली आणि शोध घेतल्यानंतर या मुलीचा आणि मुलाचा ठावठिकाणा या कार्यकर्त्यांना मिळाला. तो मुलगा मंचरमध्ये सापडल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो उडवा उडवीची उत्तरं देत होता. मुलगी विक्रोळीला आहे. मुलगी बाहेर आहे. आणि मग परत थोड्या वेळानं त्यानं चावी काढून दिली. जेव्हा हे मुलं सोडवण्यासाठी गेली, तेव्हा मुलीला बाहेरून कडीकुलूप बंद ठेवण्यात आलेलं. मुलाचं संपुर्ण कुटुंब आतमध्ये होतं, जेव्हा आई भाऊ आणि सगळे कार्यकर्ते गेल्यानंतर बुरखा घातलेली मुलगी त्याला तिथं भेटली."
 
"ज्या दिवशी मुलीची दहावीची परिक्षा संपली, त्याच दिवशी मुलीला पळवण्यात आले होते. मुलीच्या अंगावरती सिगारेटचे चटके, व्रण आढळले. या मुलीला गैरव्यवसाय करण्यासाठी त्या मुलाने, मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाचे वडील आणि मुलाची बहीण यांनी भाग पाडले. रोज अनोळखी दोन तीन पुरुष त्या घरी येत होते. या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या. त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन सापडलेलं आहे. ४ वर्षांपासुन हा प्रकार घडत होता. तेव्हा तिचे वय १६ होते. अशी सगळी परिस्थिती समोर आलेली आहे. तिची मानसिकता इतकी खराब झाली आहे की, ती वडिलांच्या सोबत ती बोललेली नाही. भावांच्या सोबत बोललेली नाही. "
 
म्हणून त्या मुलाचे सगळे नातेवाईक त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणी होत आहे. त्या मुलाच्या फोनमध्ये अनेक हिंदू मुलींचे फोटो आहेत. याची ही चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान पडळकरांनी सुप्रिया सुळेंनाही खडेबोल सुनावले. घाणेरड्या राजकारणासाठी लव्ह जिहादसारख्या घटनांना पाठबळ दिले जात आहे. असं पडळकर म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.