नोकरदारांसाठी मोठी बातमी ! आयटी रिटर्न विवरणपत्रे भरण्यास सुरूवात

    24-May-2023
Total Views |
Income Tax Department

मुंबई
: नोकरदारांना आता आयटी रिटर्न भरता येणार आहे. आयटी रिटर्न विवरणपत्रे भरण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उत्पन्नाचे आणि बचतीचे विवरण पत्र मांडण्याकरिता आणि त्यावर किती कर भरायचा आहे याबाबत आयटी रिटर्न भरण्यास आयटी विभागाने मंजुरी दिली आहे. दि. २३ मे पासून आयटीआर १ आणि आयटीआर ४ या सुविधेला मंजुरी दिली आहे. दरम्यान, आयटी रिटर्न भरताना आयटीआर-१ व आयटीआर-४ वगळता अन्य आयटीआरसाठी सॉफ्टवेअर आणि युटिलीटी लवकरच सुरू करण्यात येतील, असेही नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्राप्तिकर विभागानेविवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असल्याचेही म्हटले आहे.

आयटीआर भरणे का गरजेचे आहे?

जर तुमचे वार्षिक ढोबळ उत्पन्न करसवलत मर्यादेपेक्षा अधिक असल्यास आणि प्राप्तिकर विभागाकडून तुम्हाला कर परतावा हवा असल्यास आयटीआर भरणे महत्त्वाचे आहे. तसेच आयटी रिटर्न भरण्याची गरज ही आर्थिक वर्षात तुम्हाला विदेशी मत्तेतून (अॅसेट) उत्पन्न मिळाले असेल किंवा तुम्हा त्या मत्तेत गुंतवणूक केली असेल तर पडते.

त्याचप्रमाणे, जरी उत्पन्न करपात्र नसले तरी पुढील कारणांसाठी आयटीआर भरावा लागतो. चालू खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरली असल्यास, व्यवसायाची उलाढाल वार्षिक ६० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास आणि व्यावसायिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास आयटी रिटर्न करावा लागतो.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.