भारत माता की जय! सिडनीतून मोदीगर्जना!

    23-May-2023
Total Views |
 
PM modi
 
 
सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत माता की जय! चा गजर केला. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये २३ मे रोजी 'मोदी-मोदी'चा आवाज घुमला. पंतप्रधान मोदींनी येथे २० हजारांहून अधिक भारतीयांना संबोधित केले. ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज म्हणाले की, "पीएम मोदी हे बॉस आहेत!" भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. ऑस्ट्रेलियात मोदींच्या उपस्थितीत सिडनीच्या पश्चिमेकडील हॅरिस पार्कचे नामकरण 'लिटिल इंडिया' करण्यात आले. हॅरिस पार्कमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे.
 
परदेशातील भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारतीय लोकांचे जीवन डिजिटल क्रांतीने बदलले आहे. यामुळे आता सर्वसामान्यांपासून ते मोठ मोठ्या दुकानांपर्यंत डिजिटल क्रांती दिसत आहे. शाळांचे प्रमापपत्रे असो की लायसन्स सर्व डिजिटल लॉकरवर उपलब्ध झाले आहे. भारतातील प्रत्येक गरिबासाठी माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले आहे. सर्व गरीबाचे बँक खाती झाली आहे. देशातील ५० कोटी भारतींयाची खाती उघडली गेली आहे. त्यांना बँकेचे सर्व फायदे मिळत आहे. जनधन बँक खाते, आधार आणि मोबाइलची लिंक केली गेली आहे. जगात अनेक देशात बँकींग प्रणाली संकटात आहे. परंतु भारताची बँकींग प्रणालीचे कौतूक होत आहे. भारताने विक्रमी निर्यात केली आहे."
 
 
 
"कोरोनाच्या काळात अनेक देशांना त्यांच्या नागरिकांना पैसे पाठवण्यात अडचणी येत होत्या. पण भारतात हे काम काही क्षणातच झाले. 40% रिअल टाइम डिजिटल पेमेंट एकट्या भारतात होतात. आज फळं, भाजी किंवा पाणीपुरीच्या गाड्या असोत, सगळीकडे डिजिटल व्यवहार होत आहेत. क्रिकेट आपल्याला वर्षानुवर्षे जोडत आहे. पण आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडत आहेत. आमची खाण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आता मास्टर शेफ आम्हाला जोडत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताची ही विविधता खुल्या मनाने स्वीकारली आहे. भारतात जेव्ही तुम्ही येणार तुमच्या सोबत ऑस्ट्रेलियन मित्रांना घेऊन या. यामुळे त्यांना भारतातील संस्कृती जवळून पाहत येईल. त्यांना भारत समजून घेता येईल."
 
"जगात जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा भारत मदतीसाठी तत्पर असतो. कोणतीही आपत्ती आली तर भारत मदतीसाठी पुढे येतो. आज भारत ग्लोबल ग्रोथच्या जोरावर काम करत आहे. आम्ही जगाला जोडण्यासाठी काम करत आहोत. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न हाच आपल्या सरकारचा आधार आहे. ही आमची दृष्टी आहे." असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.