जिहादी विचाराच्या लोकांकडुन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न!'

- आ. नितेश राणेंचा त्र्यंबकेश्वर प्रकरणानंतर घणाघात

    23-May-2023
Total Views |
 
Nitesh rane
 
 
नाशिक : त्र्यंबकेश्वरची शांतता भंग करण्याचा हेतु नाही. जिहादी विचाराच्या लोकांकडुन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न झाला. त्र्यंबकेश्वर प्रकरणानंतर हिंदुंची बदनामी सुरु आहे. १३ मे च्या घटनेनंतर गैरसमज पसरवले जात आहेत. अशी भुमिका आ. नितेश राणे यांनी मांडली आहे.
 
राणे म्हणाले, "जिहादी विचाराच्या लोकांकडुन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न झाला. मंदिरात मुस्लिमांकडुन धूप दाखवण्याची कोणतीही प्रथा नाही. आज मी महाआरती करण्यासाठी एक हिंदू म्हणून आलो. धूप दाखवण्याची परंपरा आहे, हे जे वारंवार सांगण्यात येत आहे, हे साफ खोटं आहे. मी आताच यासंदर्भात विश्वस्त यांच्याशी बोललो ते म्हणाले अस कुठ्ल्याही परंपरा नाही. जे तरुण आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यांना नी जिहादी म्हणेन. 10 ते 15 तरुण येथे आले त्यांच्या हातात हिरवे झेंडे देखील होते त्यांनी आत मध्ये जाण्याचा हट्ट केला. मागच्या वर्षी पण त्यांनी हा प्रयत्न केला. कर्नाटक मध्ये सत्ता आल्यावर त्यांची हिम्मत वाढली आणि त्यांच्या सोबत आमचे काही नालायक नेते आहेत."
 
"cctv फुटेज जर विश्वस्तांनी दाखवले तर सगळ्यांचे बुरखे फाटतील. अजमेर दर्गा वर आम्ही देखील हट्ट केला तर चालेल का? आम्ही तिकडे जाऊन होम हवन करण्याचा हट्ट केला का? उगाच नाही ते उद्योग करून स्वप्न बघू नका. असेच अतिक्रमण आमच्या किल्ल्यावर होत आहे किल्ल्यावर दर्गे बांधले जात आहेत. इथे आलेल्या तो कारटा कोण आहे त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे हत्यार बाळगणारा तो युवक आहे. परत असे प्रकार केले तर स्वताच्या पायावर परत जाणार नाही. IT स्थापन केली आहे या मधून सत्य बाहेर येईल. मंदिराच्या आजूबाजूला मटण आणि चिकनचे दुकान कशाला पाहिजे?" असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
त्र्यंबकेश्वरची शांतता भंग करण्याचा आमचा हेतु नाही. उरुस बाहेरच्या परिसरातून निघतो. काही लोकं मुद्दाम आले. त्र्यंबकेश्वर प्रकरणानंतर हिंदुंची बदनामी सुरु आहे." असं नितेश राणे म्हणाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.