त्र्यंबकेश्वरात चादर चढवणाऱ्यांना मिळणार उत्तर! नितेश राणे मंदिरात दाखल
23-May-2023
Total Views | 75
नाशिक : भाजप आमदार नितेश राणे त्र्यंबकेश्वरात चादर चढवणाऱ्यांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. अन्य धर्मियांच्या त्र्यंबकेश्वर प्रवेशामुळे झालेल्या वादानंतर नितेश राणे त्र्यंबकेश्वरमध्ये आले आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे लक्ष असेल.
त्र्यंबकेश्वरमध्ये नितेश राणेंच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी वादग्रस्त घटना घडली त्या ठिकाणाची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. नितेश राणे यांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मंदिरात महाआरती करण्यासाठी नितेश राणे जाणार आहेत. या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे.