बॉयफ्रेंडसोबत 'द केरला स्टोरी' पाहायला गेली होती तरूणी, बाहेर येताच केलं असं काही...

    23-May-2023
Total Views | 3311
Love Jihad


इंदूर
: ' द केरला स्टोरी' या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होताना दिसते आहे. यामुळेच आता लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. मध्य प्रदेशात इंदूर मध्ये एक तरूणी आपल्या प्रियकारासोबत 'द केरला स्टोरी' हा चित्रपट पाहायला गेली. चित्रपट पाहून परत आल्यानंतर तिचा आपल्या प्रियकरासोबत वाद झाला. त्यानंतर तरूणीने आपल्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला.

23 May, 2023 | 10:42

इंदूरमधील हारून कॅालनीत राहणाऱ्या मोहम्मद फैजान खान या तरूणाविरूद्ध तक्रार देण्यात आली आहे. या नंतर पोलीसांनी मोहम्मद फैजान खान या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला. या सर्व प्रकरणात तरूणीचे म्हणणे आहे की, प्रेमाचे अमिष दाखवून माझ्याशी शारीरीक संबध मोहम्मदने ठेवले.त्यानंतर मला मुस्लिम धर्म स्विकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न त्यांने केला. त्यासाठी मोहम्मदने अनेक वेळा मला मारहाण केली, असेही ती तरूणी सांगते. त्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी तरूणाविरूद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मोहम्मद खान यांने स्वतांचे खरे नाव लपवून तरूणीशी मैत्री केला आणि नंतर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरूणाला अटक करण्यात आले आहे.

23 May, 2023 | 10:42
 
 
23 May, 2023 | 10:44












अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121