मुंबई : आम्हाला सर्वात त्रासदायक भोंगा म्हणजे खासदार संजय राऊत आहेत. तरी ते आज बाहेर आहेत. आमच्या मर्जीनं कारवाई होत असती तर राऊतांना अंडासेलमध्ये टाकलं असतं. असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राऊतांवर ही टीकास्त्र सोडलं.
संजय शिरसाट म्हणाले, "कारवाई ही सर्वांवर होते. आणि कधीही कोणतीही फाईल बंद होत नसते. हे शरद पवारांच वाक्य आहे. कारवाई सर्वांवर झाली पाहिजे, आणि समांतर झाली पाहिजे. जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याच्यावर कारवाई होणं गरजेच आहे. पक्षभेद, मतभेद या कारणांमुळे कोणीही कारवाई करत नाही. अनिल देशमुखांना कोर्टाने सोडलंच आहे. ते आज बेलवर बाहेर आहेत. सुप्रीम कोर्टाने ही ईडीवर ताशेरे ओढलेच आहेत. त्यामुळे ईडीने कारवाई केली, तर ती फायनल असते. अस होत नाही."