मविआत 'छोटा भाऊ, मोठा भाऊ' हे होणारच होतं ; गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

    21-May-2023
Total Views |
Shambhuraj Desai on mva

सातारा
: महाविकास आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ हे होणारच होतं, असं विधान गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईंनी केले. त्यांनी सातारा येथे महाविकास आघाडीत चाललेल्या मोठा भाऊ कोण या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले. तसेच, उध्दव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत असताना ५६ आमदारांमुळे एक नंबरला होती. तेव्हा ते नक्कीच मविआत मोठा भाऊ होते. परंतु, आता सेनेचे ५६ वरून १५ वर आमदार आल्यामुळे आता त्यांचा दर्जा लहान भावावर घसरला असल्याचे शंभूराज देसाईँ म्हणाले. त्यामुळे हे रोज होणार त्यात मला काही नवीन वाटत नाही, असेही शंभूराज देसाई म्हणाले.

दरमयान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी हाच मोठा भाऊ असल्याचा दावा केला होता. त्यावर मविआत वादंग उठले होते. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले की, डीएनए चाचणी करू त्यानंतर कळेल की मोठा भाऊ कोण असे ते म्हणाले. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले की, काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे अजित पवारांनी मोठेपणा करू नये असा टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.