अजित पवारांनी मोठेपणाचा गर्व करू नये : नाना पटोले

    21-May-2023
Total Views | 84
Nana Patole on mahavikas aaghadi

मुंबई
: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानाला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले, काँग्रेसची परंपरा ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. त्यामुळे कोणीही मोठेपणाचा गर्व करु नये असेही नाना पटोलेंनी म्हटले. याआधी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांनीही यावर प्रत्युत्तर दिले होते. आता नाना पटोलेंकडून अजित पवारांच्या विधानाला उत्तर दिले आहे.

अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे नाना पटोलेंना वाईट वाटले असेल तर त्यासंदर्भात आपण त्यांच्याशी बोलू असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती बघता राष्ट्रवादी हा मोठा भाऊ आहे या अजितदादाच्या वकतव्यात तथ्य आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.




अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121