मराठी मुस्लीम जिथे राहतात तिथे दंगली होत नाहीत : राज ठाकरे
20-May-2023
Total Views | 101
50
मुंबई : आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर मराठी मुसलमान राहतात तिथे दंगली होत नाहीत, असं सांगतानाच राज्यात काही ठिकाणी सामंजस्य आहे. काही लोकांनी ते बिघडवू नये, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. त्र्यंबकेश्वर मंदिरातील वादावरून राज ठाकरे यांनी राजकारण्यांना चांगलेच फटकारले आहे. अशा प्रकारच्या घटना कशासाठी घडवल्या जात आहेत? याच्यात कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्यावर प्रहार करणं गरजेचं आहे. जाणूबुजून काही तरी खोदून काढायचं त्याला काही अर्थ नाही. असं ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रात अनेक मशिदी मंदिरे आहेत. तिथे हिंदु-मुस्लिम एकत्र राहतात. माहिमच्या दर्ग्यात माहिम पोलिस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो. माझ्याकडे अशी अजुन उदाहरणे आहेत. ही परंपरा सुरु ठेवली पाहिजे. एखादा माणुस दर्ग्यात आला म्हणजे धर्म भ्रष्ट कसा होतो? इतका कमकुवत धर्म आहे का? अनेक मुसलमान मंदिरात येतात. आपल्याच मंदिरात काही जातींना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ देत नाही. मानसाची बघण्याची वृत्ती कोती छोटी आहे." अशी टीका राज ठाकरे यांनी केली.