संकर्षण कऱ्हाडे अपघात; चार गुंडांशी केले दोन हात

    19-May-2023
Total Views | 59
 
sankarshan karhade 
 
मुंबई : संकर्षण कऱ्हाडे सध्या प्रशांत दामले यांच्या 'नियम व अटी लागू' या चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेल्या नाट्कातकं करतोय. त्याचे प्रयोग सध्या विदेशात होत आहेत. त्यासाठी संकर्षण सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ‘नियम व अटी’ लागू या नाटकाच्या प्रयोगासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. परदेशवारीचे बरेच फोटो व व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. याचदरम्यान त्याने शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरतोय. या फोटोमध्ये त्याचा हाताला बँडेड लावले आहे.
 
बँडेड लावलेला फोटो ट्विटर वर पोस्ट करत त्याने त्याच्यासोबत एक कॅप्शनही पोस्ट केले आहे. त्या कॅप्शग्न मध्ये तो लिहितो, "माझ्यावर ४ गुंडानी हल्ला केला, त्यांच्याशी मी २ हात केले. त्यावेळी माझ्या एका हाताला दखपात झाली आणि याची तुम्हाला शून्य कल्पना असल्याने मी फोटो पोस्ट करत आहे." ४ गुंडांनी हल्ला करूनही माहिती देतानाचा संकर्षणचा सूर विनोदी होता. तसेच हात सोडून अजून काहीही दहापट संकर्षणाला झाली नसल्याने ही पोस्ट केवळ विनोदी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या पोस्टवर त्याच्या अनेक मित्र मैत्रिणीनी कमेंट्स केल्या आहेत.
 
मराठीमधील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये संकर्षण कऱ्हाडेचं नावही आवर्जुन घेतलं जातं. अभिनयाच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच तो करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121