केरला स्टोरीनंतर केरला क्राईम फाईल्स; टिझर झाला प्रदर्शित

    19-May-2023
Total Views |
 
kerla files 
 
मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी च्या प्रहद यशानंतर द केरला क्राईम फाईल्स ही मल्याळम वेब सिरीज प्रदर्शित होत आहे. या सीरिजचे टिझर सुद्धा प्रदर्शित झाले आई. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता या वेब सीरिजला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे लक्षात येते.
 
या सिरीज मध्ये लव्ह जिहाद न दाखवता इतर गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. या टीझरमधून केरळमधील गुन्हेगारी विश्व, सेक्स वर्कर्सची होणारी हत्या आणि त्याचा तपास अशी एक सस्पेन्स थ्रिलर कथा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
 
या वेबसीरिजमध्ये लाल आणि अजू वर्गीज हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका मर्डर मिस्ट्रीमागील रहस्य या वेबसीरिजमधून उलगडणार आहे अन् याचं कथानक या तपासाभोवतीच फिरताना आपल्याला टीझरमधून जाणवत आहे. शिवाय या कथानकात वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. मल्याळम सोबतच तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषेत ही सिरीज प्रदर्शित होत आहे. दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या स्पर्धेत बॉलिवूड सुद्धा मागे पडते,त्यामुळेच सूरजला मिळणाऱ्या यशाविषयी कुणालाही शंका येत नाहीए.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.