विवेक प्रकाशनाचे 'भारतमातेच्या विरांगना' पुस्तक प्रकाशित
09-Mar-2023
Total Views | 84
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व विवेक समूहाचा अमृत महोत्सव अशा अमृत मुहूर्ताचे औचित्य साधून विवेक प्रकाशनने 75 महिलांवर आधारित 'भारत मातेच्या विरांगना' हे सोनाली तेलंग लिखित पुस्तक प्रकाशित झाले. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा फाटक तसेच स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे उपस्थित होत्या. दरम्यान वेलिंगकर इन्स्टिटयूटचे प्रबंध संचालक उदय साळुंखे सुद्धा उपस्थित होते.
डॉ. वाड पुस्तकाबद्दल बोलताना त्यांनी सर्व महिलांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, "हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या स्त्रियांच्या गोष्टी आज सर्वाना माहिती व्हायला हव्यात." राणी मनकर्णिका, सावरकरांच्या पत्नी अशा अनेक स्त्रियांचे दाखले देतं त्यांनी आपलं मनोगत मांडले. डॉ. प्रतिभा फाटक यांनी सामाजिक कार्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, "आज महिला सबलिकरण किंवा सशक्तिकरण हे विषय मला वाटतात तेवढे गहन राहिले नाहीत असे हे पुस्तक वाचताना लक्षात येते." मंजिरी मराठे यांनी सावरकर बंधू यांच्या पत्नी व त्यातील आठवणी सांगत पुस्तकातील काही इतर महिलांबददलही आपली मते व्यक्त केली. प्रास्ताविकात अश्विनी मयेकरांनी विवेक प्रकाशनच्या कार्याचा परिचय देत सामाजिक क्षेत्रात असलेल्या विवेकच्या योगदानबद्दल माहिती दिली.
पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर विवेकच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली.