पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे हृदयात ब्लॉकेज!

    08-Mar-2023
Total Views |
 
Heart Attack
 
पुणे : पुण्यातल्या धनकवडी इथं राहणाऱ्या महिलेने पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे आपल्या हृदयात ब्लॉकेज निर्माण झालं, अशी तक्रार केली आहे. तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचं २०२१ मध्ये धनकवडी इथल्या प्रतीक यांच्याशी लग्न झालं होतं.
 
मात्र, काही महिन्यांमध्ये पती आणि सासरची मंडळी आपल्याला वारंवार मानसिक त्रास देत असल्याचं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. दोन वर्षांपासून आपला सतत मानसिक छळ होत आहे. या त्रासामुळेच आपल्या हृदयात ब्लॉकेज आढळलं आहे, अशी तक्रार या महिलेने दिली आहे.
 
पुणे शहरातील धनकवडी येथे राहणाऱ्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार जुलै २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी पती आणि सासरच्या इतर मंडळीच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.