‘टॅक्स सेव्हिंग्स’साठी ‘एसआयपी’

    17-Mar-2023
Total Views |
SIP for Tax Savings


’इनकम टॅक्स अ‍ॅक्ट १९६१’च्या ‘सेक्शन ८०सी’ नुसार गुंतवणूकदारांना ‘टॅक्स सेव्हिंग’साठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’ हा पर्याय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होताना दिसतो. खासकरून गुंतवणूक करताना ’इक्विटी’मध्ये होणार्‍या वाढीसोबत ‘टॅक्स सेव्हिंग’चाही विचार प्रामुख्याने करतात. मागील दोन वर्षांत ’इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’ श्रेणीमध्ये २२ लाख ‘फोलिओ’ जोडले आहेत. या श्रेणीतील ‘फोलिओ’मध्ये डिसेंबर २०२० पासून डिसेंबर २०२२ पर्यंत १.२३ कोटींवरुन १.४६ कोटींपर्यंत वाढ झाली.

‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’ श्रेणीत गुंतवणूकदारांना ‘टॅक्स सेव्हिंग बेनिफीट’बरोबर ‘लाँग-रन इनव्हेस्टमेंट’मध्ये चांगले ‘रिटर्न्स’ देण्याची क्षमता आहे, हे दोन फायदे गुंतवणूकदारांना होतात. त्याचबरोबर ‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’मध्ये ‘सेक्शन ८०सी’ अंतर्गत ‘टॅक्स सेव्हिंग सेगमेंट’मध्ये इतर ‘म्युच्युअल फंड’ श्रेणीपेक्षा सगळ्यात कमी म्हणजेच तीन वर्षांचा ‘लॉक इन पीरिएड’ गुंतवणूकदारांना मिळतो. ‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’मधील तीन वर्षांच्या ‘लॉक इन पीरिएड’चा एक फायदा गुंतवणूकदारांना होतो, तो म्हणजे हा ‘लॉक इन पीरिएड’ गुंतवणूकदारांना शेअर बाजार अस्थिर असताना ’विड्रॉ’ करण्यापासून रोखतो, याचा परिणाम आपल्याला अधिक नफा मिळतो. तीन वर्षांच्या ‘लॉक इन पीरिएड’ नंतर ‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम फंड’ची विक्री करण्याची सक्ती नसते, त्याचा वापर आपण ‘निवृत्तिनंतरचा प्लान’ म्हणून पण करू शकतो.
 
बर्‍याचदा गुंतवणूकदार आर्थिक वर्षाअखेरीस कर वाचवण्याचा प्रयत्न करत असताना वर्षाअखेरीसच शेअर बाजारात गुंतवणूक करू लागतात. परिणामी, आपण वेळेचा फायदा घेत नाही आणि तेव्हा गुंतवणूक करतो, जेव्हा शेअर्सच्या किमती जास्त असतात. ‘इक्विटी’ ही मालमत्ता म्हणून अस्थिर असणे स्वाभाविक आहे आणि जर आपण चुकीच्या वेळेला गुंतवणूक केली, तर येणारे ‘रिझल्ट्स’ कदाचित आपल्या हिताचे नसतात किंवा येणारा नफा कमी होऊ शकतो. शेअर बाजार हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ‘रीअ‍ॅक्ट’ करत असतो. ‘कोविड’मुळे होणार्‍या परिणामांबद्दल खास करून जगावर आलेल्या आर्थिक संकटाबद्दल कोणाला शक्यता वर्तवता आली असेल का? शेअर बाजाराचे तसेच आहे. शेअर बाजाराचे अचूक अंदाज वर्तवणे अशक्य आहे.

शेअर बाजारातील एक अडथळा म्हणजे, आपण गुंतवणूक करत असताना आपले बाजारासंबंधी असलेले पूर्वग्रह दूर करून गुंतवणूक करणे. बाजारात गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारांना लोभ आणि भीती यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना तर्कशुद्ध निर्णय घेण्यास अडचण येते, त्यासाठी ‘सिस्टीमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान’ ‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’मध्ये गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गुंतवणूकदार स्वतः ठरवू शकतात, त्यांना किती गुंतवणूक करायची आहे आणि ‘एसआयपी’ सुरू करू शकतात. गुंतवणूकदाराचे पैसे वर्षभर गुंतवले गेले की, परतावा चांगला मिळण्याची शक्यता जास्त असते. ‘एसआयपी’चे दोन फायदे आहेत. एक म्हणजे मार्केटमध्ये होणार्‍या चढ-उताराचा आपल्या ‘बिहेविअर’वर परिणाम होत नाही आणि आपल्याला आपल्या ‘इमोशन’वर मात करायला मदत करतो.

शेवटी गुंतवणूकदारांना ‘टॅक्स सेव्हिंग प्लान’ करत असताना आपल्या घरगुती बजेटवर होणार्‍या अवाजवी दबाव कमी करण्यास मदत होते. ’एसआयपी’मुळे आपल्या बचतीची सवय लागते आणि त्यामुळे आपले ‘लाँग टर्म फायनान्शियल गोल्स’ साध्य होतात आणि म्हणूननच ‘एसआयपी’ फक्त आपल्या गुंतवणुकीतून आपल्याला फक्त उत्तम ‘रिटर्न्स’ मिळवून नाही देत तर शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी करते आणि आपल्याला नियमित गुंतवणुकीची सवय लावते.-श्रीनिवास रावराऊरी
 
 
(लेखक ‘पीजीम इंडिया म्युच्युअल फंड’चे ‘सीआयओ’ आहेत.) 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.