समीर खक्कर यांनी घेतला अखेरचा श्वास

    15-Mar-2023
Total Views |
 
khakkas
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते समीर खक्करयांचं निधन झालं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'नुक्कड'मधून खोपडी या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. परंतु त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 71 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
समीर खक्कर हे गेल्या 37 ते 38 वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या विविध धाटणीच्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांना पसंत पडत होत्या. काही दिवसांपूर्वीच अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यांनतर आता समीर खक्कर यांच्या निधनाचे वृत्त समोर आलं आहे. या कलाकारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
 
समीर खक्कर यांच्यावर मुंबईतील, बोरिवली स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार केलं जाणार आहेत. ते सध्या 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर मनोरंजन सृष्टीतून दुःखद प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोशल मीडियावरुन लोक त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.