हसन मुश्रीफांच्या घरी ईडीच्या छापा! मुश्रीफांच्या पत्नीची ईडीच्या कारवाईत आडकाठी
11-Mar-2023
Total Views |
184
कोल्हापूर (Hasan Mushrif Ed raid) : हसन मुश्रीफांवर सलग दुसऱ्या दिवशी ईडीची धाड पडली आहे. शनिवारी मुश्रीफांच्या घरावर ईडीने छापा मारला. पहाटेपासूनच ही कारवाई सुरू होती. ईडीच्या कारवाईचा सुगावा आधीच लागल्याने मुश्रीफांनीही कार्यकर्त्यांचा फौजफाटा तयार ठेवला होता. सुरुवातीला कागल परिसरातील कार्यकर्ते ठिय्या देत होते. त्यानंतर जिल्हाभरातील महिला कार्यकर्त्यांना मुश्रीफांनी आंदोलन करण्यास भाग पाडले. पोलीसांनी कार्यकत्यांना घराच्या परिसरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलीसांनाही कार्यकर्ते जुमानत नसल्याने तणावपूर्ण वातावरण तयार झाले.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या फौजफाट्यासह ईडीचे अधिकारी घरात उपस्थित होते. त्याशिवाय पोलीस दलही परिस्थिती नियंत्रणात रहाण्यासाठी उपस्थित होते. दीड महिन्यातील मुश्रीफांच्या घरावर ही दुसरी धाड होती. भाजप सरकार विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले होते. आम्हाला गोळ्या घाला आणि मग जा, अशी प्रतिक्रीया मुश्रीफांच्या पत्नीने दिली आहे.
ईडी कारवाईवेळी शांत रहाण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले आहे. दरम्यान, कारवाईवेळी मुश्रीफ उपस्थित नव्हते. दरम्यान, कार्यकर्त्यांशी पोलीसांशी झटापट झाली होती. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही कार्यकर्ते सुरक्षा कवच भेदून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. ईडीचे एकूण पाच अधिकारी मुश्रीफांच्या घरी उपस्थित होते.