ब्रेकींग ठाण्यात ठाकरे-शिंदे गट एकत्र!

    10-Mar-2023
Total Views |

Uddhav Thackeray


ठाणे : शिवसेनेत दुफळी माजुन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर येनकेन प्रकारे शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध उद्धव ठाकरे गटात नेहमीच वादाचे प्रकार घडत आहेत. असे असताना शुक्रवारी (दि.१० मार्च) तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीला सेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याचे दुर्लभ चित्र कोपरीत दिसुन आले.

कोपरीतील चेंदणी कोळीवाडा येथील शिवसेना शाखेच्या शिवजयंतीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (शिंदे गट) कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,प्रकाश कोटवानी,हेमंत पमनानी आणि ठाकरे गटाचे कृष्णकुमार कोळी तसेच दोन्ही गटांचे पदाधिकारी एकाच मंचावर उपस्थित राहील्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याच शाखेवरून काही महिन्यापुर्वी दोन्ही गट एकमेकांशी भिडल्याने शुक्रवारीही कोपरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता.




Eknath Shinde Party

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनावरुन वाद असला तरी, आपण आपले सर्व सण तिथीनुसारच साजरे करतो. त्यामुळे शिवप्रेमी देखील तिथीनुसारच शिवजयंती साजरी करतात. या अनुषंगाने, ठाण्यात शिवसेनेकडुन तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.ठाणे पूर्व कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा आणि साईनाथ नगर येथील शाखेत साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्याला शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी आवर्जुन हजेरी लावत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारांची जपणुक केल्याचे दिसुन आले.

कोपरीतील या शिवजयंतीला शिंदे गटातील गोपाळ लांडगे, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, रमाकांत पाटील,संतोष बोडके, संतोष पांचाळ,राजु शेलार तर ठाकरे गटातील कृष्णकुमार कोळी,नाना सावंत आदींसह दोन्ही गटातील महिला उपस्थित होत्या.दोन्ही गटांनी सौहार्दपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी केल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.