सुनेचे हातपाय बांधले! मासिक पाळीचे रक्त जादुटोण्यासाठी विकले!

पालकमंत्री चंदक्रांतदादा पाटील यांच्या पोलिसांना सूचना

    10-Mar-2023
Total Views |
menstrual-cycle-superstitions-incident-in-pune


पुणे
: सासरकडील मंडळींनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचे हातपाय बांधूने मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी आणि धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हाही केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कडक कल लावण्यासंबंधितचे आदेश पुणे जिल्हयाचे पालकमंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील दिली. ते शुक्रवारी (10 मार्च) मुंबईत विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पुण्यात सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावंही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत. संबंधित आरोपींविरोधात कडक कलमे लावण्याचे पोलिसांना निर्देश या प्रकरणी पोलीस आयुक्तांशी बोललो. संबंधित घटना पुणे ग्रामीणमधील असल्याने त्या पोलिसांशी चर्चा केली. जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असे निर्देश दिले, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. असे प्रकार करताना कायद्याची जी भीती वाटली पाहिजे ती त्यांना वाटत नाही. त्यांना कायद्याची भीती वाटली पाहिजे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील आहेत.

नेमकं प्रकरण काय?

 
मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.