संजय राऊतांनी दिल्या अर्वाच्च्य भाषेत उद्धव ठाकरेंना शिव्या!

शिवसेनेतील माजी आमदाराचा गौप्यस्फोट!

    24-Feb-2023
Total Views | 141

Sanjay Raut




रत्नागिरी :
रश्मी ठाकरे जेव्हा सामनाच्या संपादकपदी नियुक्त झाल्या त्यावेळी त्यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही संजय राऊतांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या होत्या. ही गोष्ट राऊत विसरले असतील पण विसरलेलो नाही, असा गौप्यस्फोट माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला होता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी कदमांनी खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

"संजय राऊत खरे शिवसैनिक नाहीत. पण उसणं अवसान आणून आपणच शिवसेना वाचवत आहात, असा अविर्भाव ते आणत आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला फसवत आहेत. राऊतांच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. संजय राऊत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना कशा पद्धतीने अश्लील भाषेत शिव्या दिल्या होत्या,याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.",असेही ते म्हणाले.

कदम म्हणाले की, "संजय राऊतांना मी एवढंच सांगेन की, मी कालपर्यंत गप्प बसलो होतो. मी संजय राऊतांवर कधीही टीका केली नव्हती. पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. संजय राऊत आपण विसरला असाल पण मी विसरलेलो नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी 'सामना' वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती केली. तेव्हा तुम्ही माझ्यासमोर दोघांना अश्लील भाषेत किती शिव्या घातल्या होत्या. कदाचित तुम्ही हे विसरले असाल पण मी विसरलो नाही."
बाटगा अधिकच कडवा असतो!

संजय राऊत उसने अवसान आणून शिवसेना आपणच अविर्भाव आणत देशाला फसवण्याचे काम आपण करत आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की बाटगा अधिक कडवा असतो तोच कडवेपणा तुम्ही दाखवत आहात, अशी टीका त्यांनी केली आहे.



उद्धव ठाकरे हुकूमशाह सारखे वागले!

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबानंतर पक्षात हुकूमशाही सुरू केली. माझ्या मुलाला संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्याच पक्षाचा आमदाराला आपणच कसे संपवता? कुठला पक्षप्रमुख असा वागत असतो?, असा जाब रामदास कदम यांनी विचारला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121