नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यादरम्यान, एक व्यक्ती फ्री पॅलेस्टाईन या नावाची टी-शर्ट परिधान करून थेट मैदानात विराट कोहलीजवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, या सर्वप्रकाराची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. यानंतर आता यूएस आणि कॅनडा स्थित खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनने ऑस्ट्रेलियन जॉन्सनसाठी दहा हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.
दरम्यान, विश्चचषक अंतिम सामन्यावेळी ज्याने सुरक्षा भंग केला आणि "फ्री पॅलेस्टाईन" टी-शर्ट परिधान करून मैदानात प्रवेश केला. त्याच्या समर्थनार्थ खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नून याने थेट बक्षीस जाहीर केले.