"ऑस्ट्रेलियाबरोबर २००३ चा बदला घ्या", सिद्धार्थ चांदेकरने दिला भारतीय संघाला सल्ला

    18-Nov-2023
Total Views |

siddharth chandekar 
 
मुंबई : एकदिवसीय विश्वचषकच्या अंतिम सामन्याकडे सध्या संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात चुरशीची लढत १९ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. अहमदाबादयेथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपसाठीचा थरार पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकारांसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील क्रिकेटप्रेमी आहे. आणि भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याबद्दल त्याने रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. सिद्धार्थने यावेळी भारतीय क्रिकेट संघाला एक सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "माझी इच्छा आहे की त्या ऑस्ट्रेलियाची अशी टेचा ना. २००३ चा बदला असा घेतला पाहिजे ना आपण की ते परत आलेच नाही पाहिजेत. ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आले याचा मला खरं तर आनंद झाला आहे. ते टफ टीम आहेत.पण, आपले लोकही उत्तम क्रिकेट खेळतात." सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
माझ्या आईला एका जोडीदाराची गरज वाटणं हे मॉर्डनायझेशन नाही
 
आपल्या आईचे दुसरे लग्न का लावले? याचं कारण सिद्धार्थ चांदेकरने महाएमटीबीशी बोलताना सांगितले. २४ नोव्हेंबर रोजी झिम्मा २ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यादरम्यान संवाद साधताना सिद्धार्थ त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल व्यक्त झाला. यावेळी तो म्हणाला की, “माझ्या आईला एका जोडीदाराची गरज वाटणं हे मॉर्डनायझेशन नसून तर ती माझी आणि माझ्या आईची गरज होती”.
 
पाल्यांनाच त्यांच्या आई-वडिलांचे खरे डोळे समजतात
 
माझ्या आईला एका जोडीदाराची गरज वाटणं हे मॉर्डनायझेशन नाही आहे. तर ती माझी आणि माझ्या आईची गरज आहे. ट्रोलिंगकडे मी फारसं गंभीरपणे पाहिलं नाही कारण माझ्या आईचं जीवन ती लोकं तर माझी आईच तीचं आयुष्य जगत आहे. आणि मी पाहिलं आहे तिने तिचा एकटेपमा कसा सहन केला, त्या एकटेपणातही तिने माझा सांभाळ कसा केला, मला कसं मोठं केलं आहे. महत्वाचं म्हणजे, मला माझं लग्न झाल्यानंतर समजलं की, जोडीदार सोबत असला की आपल्या जीवनात एक स्थैर्य येते. आणि संवाद साधणारी व्यक्ती जर का सोबत असेल तर त्याचा आपल्या जीवनात किती आणि कसा फरक पडतो हे मला माझ्या लग्नानंतर अधिक जाणवलं. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, पोरांनाच त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील सुख आणि दु:ख दिसून येतं, केवळ त्यांनाच ते खरे डोळे दिसतात आणि समजतात. आणि तेच हेरुन मी तिला तिला देखील तिचे पुढचे आयुष्य सुखात घालवण्याचा अधिकार आहे हे जाणवून दिलं आणि पुढचा प्रवास घडला”.
 
दरम्यान, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोबत सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे अशा ७ अभिनेत्री दिसणार आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.