बॉईज ४ ओटीटीवर प्रदर्शित.. कुठे? जाणून घ्या....

    17-Nov-2023
Total Views | 25

boys 4 
 
मुंबई : मराठीतील पहिला चित्रपटाचा सिक्वेल जो यशस्वी झाला तो म्हणजे बॉईज ४. चित्रपटाचे कथानक, अभिनेते या सगळ्यांनीच प्रेक्षकांचे मन जिंकले. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना बॉईज ४ चित्रपट पाहता येणार आहे तो देखील घरबसल्या. चित्रपटगृहानंतर ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांना आवडीचा चित्रपट पाहण्याची मुभा आहे. हिंदी चित्रपटांपाठोपाठ आता मराठी चित्रपटही ओटीटीवर येत आहेत. आता बॉईज ४ हा चित्रपट Amazon Prime वर प्रदर्शित झाला आहे.
 
'बॉईज ४' मध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे अशी नव्या दमाच्या कलाकारांची फळी होती. याशिवाय गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी यांनीही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121