केरळमध्ये डाव्यांच्या कुरापती सुरुच; हिंदू मंदिरात थाटले पक्षाचे कार्यालय
17-Nov-2023
Total Views |
कोची : केरळमध्ये सत्ताधारी सीपीआय(एम) या पक्षाने पूजापुरा येथील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची हिंदू मंदिरे, सरस्वती मंडपम आणि नवरात्री मंडपम यांचा उपयोग राजकीय कामात करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हिंदू मंदिरांचे रुपांतर राजकीय प्रचार मंचात केले आहे. डाव्या पक्षाच्या या कृत्याला भक्तांनी आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. पण कोणाच्याच विरोधाला न जुमानता सरस्वती मंडपमचे रुपांतर राजकीय कार्यालयात करण्यात आले.
भक्तांच्या विरोधानंतर सीपीआय(एम) कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्या दिल्या. असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यासोबतच या सगळ्यात सीपीआय(एम)च्या एका ज्येष्ठ नेत्याचा आणि त्यांच्या गटाचा सहभाग आहे. असा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे. देवस्वोम बोर्डाच्या मंदिरांजवळ झेंडे फडकवण्यास किंवा राजकीय सभा घेण्यास मनाई आदेश असतानाही सीपीआय(एम) ने हे कृत्य केले.
या घुसखोरीला केरळ सरकारने पाठिंबा दिल्याचे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. सरस्वती पूजा समारंभाच्या वेळी, मंडपम हे भक्तांद्वारे एक पवित्र स्थान मानले जाते, जेथे पूजा आणि भक्ती संगीत सादर केले जाते. पारंपारिकरित्या, मंडलम-मकरविलक्कू यात्रेकरूंच्या हंगामात अय्यप्पा पूजेसाठी मंडपम वापरला जातो. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की मंडपम आणि मंदिर त्रावणकोरवर राज्य करणाऱ्या अनिझम थिरुनल मार्तंडा वर्मा यांनी बांधले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.