किरकोळ महागाई दर घसरला; सणासुदीच्या काळात सामान्य लोकांना दिलासा
13-Nov-2023
Total Views | 23
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात महागाईच्या आघाडीवर काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर ४.८७ टक्क्यांवर आला आहे. १३ नोव्हेंबर रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत कमी झाल्यामुळे आणि काही वस्तूंच्या किमती घटल्यामुळे महागाईत घट झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये ४.८७ टक्के हा किरकोळ महागाईचा दर अपेक्षेनुसार आहे. ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर महागाई ४.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली होती. तथापि, किरकोळ महागाई दर हा भारतीय रिझव्र्ह बँकेच्या २-६ टक्क्यांच्या मर्यादेच्या आत आहे. मागच्या काही काळात महागाई रिझव्र्ह बँकेने ठरवलेल्या मर्यादेच्या बाहेर जात होता.