AI च्या क्षेत्रात गुगलची मोठी गुंतवणूक; 'या' कंपनीचे करणार अधिग्रहण
13-Nov-2023
Total Views |
वॉशिंग्टन, डी. सी : जगातील दिग्गज कंपनी गुगल आता एआयच्या क्षेत्रात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. काही रिपोर्टनुसार, गुगल चॅटबॉट स्टार्टअप क्यारेक्टर.एआय मध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. गुगल आपल्या क्लाउड सेवा आणि टेन्सर प्रोसेसिंग युनिट्समध्ये आधीपासूनच क्यारेक्टर एआय या चॅटबॉटचा वापर करत आहे.
क्यारेक्टर एआयची सुरुवात गुगलचे माजी कर्मचारी नोआम शाजिर आणि डॅनियल डी फ्रीटास यांनी केली होती. स्टार्टअप लोकांना त्यांचे स्वतःचे चॅटबॉट्स आणि एआय सहाय्यक तयार करून देते. हे चॅटबॉट यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. काही प्रीमियम सुविधांसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येते.
क्यारेक्टर एआयचे चॅटबॉट्स, एकच आवाज वेगवेगळ्या प्रकारे तयार करु शकतो. त्यामुळे क्यारेक्टर एआयचे चॅटबॉट्सचे वापरकर्ते १८ ते २४ वयोगटातील तरुण आहेत. गुगलसोबत चाललेल्या गुंतवणूकीच्या चर्चेसोबतच क्यारेक्टर एआय कंपनी इतरही गुंतवणूकदारांसोबत चर्चा करत आहेत. क्यारेक्टर एआयचे संभावित मूल्य ५ अब्ज डॉलर्स आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.