प्रसाद ओक यांचा नवा चित्रपट : तोच मी... प्रभाकर पणशीकर
02-Jan-2023
Total Views | 84
मुंबई : 'तोच मी... प्रभाकर पणशीकर' नावाचा नवा चित्रपट लवकरच रंगभूमीवर येतो आहे. अभिनेता प्रसाद ओक यांनी नुकतीच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा फेसबुक पोस्ट वरून केली आहे. आणि काशिनाथ घाणेकर या चित्रपटानंतर नवीन चित्रपट घेऊन येत आहोत असे म्हणत नव्या चित्रपटाची घोषणा त्याने केली आहे.
पोस्टर मधून " ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नंतर मराठी रंगभूमीच्या सोनेरी इतिहासातील पुढचं पर्व, श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्स प्रस्तुत 'तोच मी... प्रभाकर' प्रसाद ओक अभिनित, अभिजित शिरीष देशपांडे यांचे लेखन व दिग्दर्शन" असे म्हणत आपल्या पोस्ट मधून प्रसाद लिहितो, "नवं वर्ष.. नवं स्वप्न.. सोबत जुनेच मित्र कलावंत.. आणि.. आशीर्वाद देणारे आहेत "पंत"."
प्रभाकर पणशीकर म्हणजेच पंत हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित तो मी नव्हेच ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ओशाळला मृत्यू ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध आहे. प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली.
या पंतांवर आधारित चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत आहे.