अरमान कोहलीला अखेर १ वर्षानंतर मिळाला जामीन!

    21-Sep-2022
Total Views | 131

ak
 
 
मुंबई: ड्रग्स प्रकरणात अभिनेता अरमान कोहलीला जामीन मिळाला आहे. तो गेल्या एक वर्षापासून तुरुंगात आहे. एनसीबीने गेल्या वर्षी अरमानच्या घरातून १.२ ग्रॅम कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी २० सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत अरमानचा जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांचा जातमुचलक भरल्यानंतर त्याला जामीन देण्यात आला.
 
 
मात्र, याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या करीम धनानी आणि इम्रान अन्सारी या अन्य दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याने अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो कोर्टाने फेटाळला होता.
 
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
 
अरमान कोहलीला गेल्या वर्षी २८ ऑगस्ट २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. त्याची पहिली जामीन याचिका एस्प्लेनेड मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी फेटाळली आणि दुसरी मुंबई सत्र न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी फेटाळली. NCB ने प्रथम एका व्यक्तीला (अजय राजू सिंग) बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याबद्दल अटक केली. त्यानंतर त्याने अरमानला अनेक वेळा ड्रग्स विकल्याचा खुलासा केला.
 
 
यानंतर एजन्सीने अरमानच्या अंधेरीतील घराची झडती घेतली आणि त्यावेळी त्याच्या घरात १.२ ग्रॅम कोकेन सापडले आणि अरमानला तुरुंगात टाकण्यात आले. दरम्यान, अरमानने वकील तारक सय्यद यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता, कारण या प्रकरणात अटक करण्यात आलेले अन्य दोन आरोपी आधीच जामिनावर बाहेर आहेत. वकिलाने सांगितले की, अभिनेत्याकडून जप्त केलेल्या साहित्याचे प्रमाण १.२ ग्रॅम कोकेनपेक्षा कमी होते.
 
 

अरमानला यापूर्वीही मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे
 
अरमानला 'बिग बॉस 7' दरम्यान अटक करण्यात आली होती. खरं तर, सोफिया या शोच्या स्पर्धकाने त्याच्यावर मॉपने मारल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला. नंतर सोफियाने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोपही केला. मात्र, काही दिवसांनी अरमानची जामिनावर सुटका झाली. अरमानने 'जानी दुश्मन', 'कहार', 'जुआरी', 'LOC कारगिल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121